
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट खटकली तर ती समोरासमोर बोलून दाखवायची अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांच्या याच स्वभावाचा परिचय पुन्हा एकदा आला आहे. निमित्त होते पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन
अजित पवार यांनी नुकतेच पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन करून तिथल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामात त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्यामुळं ते नाराज झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच ते तडक एका गोठ्याजवळ गेले. तेथील आतील जमीनीचा स्तर समांतर नव्हता. अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. याआधी पुण्यातच पोलीस मुख्यालयाच्या नूतनीकरणीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी सुध्दा दर्जा बाबत ते भडकले होते.आमच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही अगदी छा-छू काम केलं आहे असे पवार म्हणाले होते.