
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम –राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोहारा तालुका निरिक्षक पदी
नेमणुक झाल्या बद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय पाटील अरसोलीकर,पंचायत समिती गट नेते काकासाहेब चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच रामेश्वर खंडागळे, राजाभाऊ कोकाटे, सरपंच अशोक गायकवाड, सरपंच उमेश नाईकिंदे, सरपंच प्रदीप शेळके, अपंग सेल चे जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण, भूम तालुका कोषाध्यक्ष हनुमंत बोराडे, हमीद शेख, चातृभुज डोके आदी उपस्थित होते.