
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -भरत पवार
लोहा येथुन जवळच असलेल्या कारेगाव येथे मार्च महीण्यापासुनच तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती.तेंव्हा गावातील बौध्द वस्तीमध्ये पाण्याचा स्त्रोत नसल्यामुळे व पाणी पातळी खाली गेल्यामुळे बौध्द वस्तीमध्ये पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली असता माजी सरपंच श्यामसुंदर किरवले यांनी स्वताच्या मालकी विहीरीचे पाणी दोन महीने पाजले व कालांतराने श्यामसुंदर किरवले यांचे विहीरीचे पाणी कमी झाले व बौध्द वस्तीमधिल नागरीक पाण्यासाठी रात्रं दीवस भटकंती करु लागले होते.तरी कारेगाव ग्रांमपंचायतला एखादे विहीर,बोअर अधिग्रहन कींवा एखादे टॅंकरचा प्रस्ताव दाखल करण्याचे सुचले नाही.व उन्हाळा संपत आला तरी बौध्द वस्तीसाठी अधिग्रहणाचा प्रस्ताव अद्याप ग्रामपंचायतने पंचायत समितीला दाखल केला नाही. व वरीष्ठांनी कारेगाव बौध्द वस्तीच्या पाणी टंचाईकडे लक्ष दिले नाही.तेंव्हा उन्हाळ्याच्या शेवटच्या में महीण्यात बौध्द वस्तीमध्ये तिव्र पाणी टंचाईच्या झळा सुरु झाल्या तेंव्हा तिव्र पाणी टंचाई दुर करण्यासाठी व गोरगरीब समाजाला स्वताच्या पैशाने विकत पाणी आणुन पाजण्यासाठी आमदार व खासदार यांचे निकटवर्तीय व कारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व कपिल पाटील किरवले हे पुढे सरसावले व खरोखरच विकत पाणी आणुन गोरगरीब दिन दलीतांना पाणी पाजण्यासाठी कपिल पाटील किरवले देवदुत होऊन धावले त्याबद्दल कारेगाव परीसरामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.