
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा: देि.२७
भारतीय हे तेजाचे पुजारी आहेत अंधाराचे नाही विज्ञानयुगात आपण जे काही शिकतोय तेवढे आपण गुलाम व आंधळे बनत आहोत. वाढदिवस साजरा करताना दिवे विझवतो.केक कापतो. केकचा तुकडा एकमेकांना भरवतो तर केकवरील क्रीम थोबाडाला फासतो. स्वतःला विज्ञानवादी समजतो. दिर्घ आयुष्यासाठी दिवा विझवतो. केक भरवतांना माणासाच्या लाळेत जंतू असतात हे विसरतो. क्रिम तोंडाला फासून अन्न वाया घालवतो. हा सर्व प्रकार मागासलेपणाचा आहे. वास्तविक भारतीय संस्कृतीने हे शिकविले नाही. शहरी वातावरणात राहून आम्ही स्वतःला पुढारलेेले, सुधारणावादी समजतो अनेक मराठी शब्द, जुन्या सवयी आपण विसरत चाललो आहोत. भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. या विज्ञानयुगात भारतीय संस्कृतीचा विसर पडता कामा नये. असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
स्व. भास्कराव देशपांडे व स्व. रामभाऊ लिंगाडे यांच्या स्मृतीनिमित गर्दे वाचनालायाच्या वतीने सच्चिदानंद शेवडे यांच्या भारत काल आज आणि उद्या या विषयावरील दोन दिवसांच्या व्याख्यान माला, बुलडाणा शहरात वृक्षारोपन उपक्रम राबविण्याच्या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन गर्दे सभागृह येथे करण्यात आले होते. या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकूळ शर्मा होते. तर उदघाटक म्हणून बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक तर प्रमुख उपस्थिती मध्ये रामभाऊ लिंगाडे पतसंस्थेचे कार्यकारी संचालक धिरज लिंगाडे तर गर्दे वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे हे होते.या प्रसंगी राधेश्याम चांडक म्हणाले की, बुलडाणा शहराचे तापमान दिवसेदिवस वाढत आहे त्या उदेशाने गर्दे वाचनालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेला वृक्षारोपन हा स्तूत्य उपक्रम आहे बुलडाणा अर्बनच्या वतीने डोंगरखंडाळा येथे सुद्धा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या दोन्ही उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांचा गर्दे वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रास्ताविक व संचलन वाचनालयाचे संचालक संजय कुळकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला शहरांतील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. आज दि. २७ मे रोजी सायंकाळी सात वाजता दुसरे व्याख्यानाचे सत्र होणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.