
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
राष्ट्रवादी काँग्रेसचे थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना निवेदन…
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासूर स्टेशनसह हद्दीतील गावात गुटखा,मटका, गांजा, गल्लोगल्ली विक्री होत असलेली देशी व गावरान दारूची बेकायदेशीर विक्री,स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ, गहू यांची बेकायदेशीर विक्री, शिवणार नदीतील अवैध वाळू वाहतूक,ओव्हेरलोड वाहतूक आदी अवैध धंदे बोकळाले असून त्यामुळे अल्पवयीन मुळे दारू, गांजा, व्हाईटणर आदी व्यसनच्या आहारी गेले आहे व त्यामुळे मारामाऱ्या, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यात वाढदिवसाच्या झाली असून पोलिसांवरही गुन्ह्याचा तपास लावण्याचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे हे अवैध धंदे तात्काळ बंद करावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकार्यद्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे यानी मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंती दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले असून पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक लिंगायत,चेतन मढीकर, आकाश दोंदे, कुणाल वाघ,रोहित अहिरे,प्रदीप पगारे,आतिफ शेख, सांगर पाखरे, आदिसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
सुनील पाखरे :- (तालुका कार्यद्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, गंगापूर )शिल्लेगाव पोलीस हद्दीत अवैध धंदे बोकळाले असून त्यात शिवणार नदी पत्रातून दिवसरात्र वाळूमाफियानी उपसा करण्याचा सपाटा लावला असून त्याच्यावर कोणाचाही धाक राहिला नसून त्यात भरीसभर दारू, गांजा, रेशनचे धान्य,अवैध दारू वाहतूक,यांचीही तस्करी जोरात चालू आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले असून कारवाई झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.