
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- वीज वितरण कंपनीकडून वीज मीटर उपलब्ध नाही असे वीज मीटर बंद असलेल्या वीज ग्राहकांना सांगण्यात येते,परंतू वीज ग्राहकांनीही असा विनंती करावी की,माझ्या घरातील विज वापरांचा एस.आय.आर.घेवुन निश्चित विज वापर तात्तपुरते नविन वीज मीटर बसवुन एस.आय.आर घेवुन तसेच ग्राहकांकडून त्याबाबत नियमानुसार वीज शुल्क भरुन नवीन वीज मीटर येईपर्यंत निश्चित वीज युनिट वापरांचा वीज
बिल येईल त्यापेक्षा जास्त वीज युनिटची अतिरिक्त वीज आकारणी होणार नाही याची खात्री वीज वितरण कंपनी कडून घ्यावी असे अंजनगाव सुर्जी ग्राहक पंचायत सेवा व मार्गदर्शन तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदीजामेकर यांनी म्हटले.
जोपर्यंत नविन मीटर बसविले जात नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीची जबाबदारी राहील,असे वीज मीटर बंद असलेल्या वीज ग्राहकांनी तक्रार अर्जात लेखी निवेदन देऊन त्याची प्रत संबंधीत अभियंता यांच्या सही शिक्यानिशी आपणाकडे ठेवावी म्हणजे वीज वितरण कंपनी आपल्या कडून मीटर उपलब्ध नाही हे कारण दाखवुन आपली आर्थिक लुट करणार नाही;वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.याबाबत ग्राहक पंचायत सेवा मार्गदर्शन घ्यावे किंवा संपर्क करावा असेही ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष शिंदीजामेकर यांनी म्हटले.
ग्राहक पंचायत सेवा व मार्गदर्शन केंद्र