
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा:दि.३ माझे केंद्रीय शिक्षका होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असुन आता माझी जबाबदारी वाढली आहे. यापुढे धम्मप्रचाराची खेड्यापाड्यातुन सुरूवात करणार असल्याचा मनोदय दिपाली इंगळे सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केला.भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ( चैत्यभूमी ) दादर मुंबई येथे करण्यात आले होते.ह्यावेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या बुलडाणा जिल्हा महिला सचिव दिपाली इंगळे , पद्ममीनी तायडे,रोशणी सरदार, सुनिता वानखडे यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदुराच्या वतीने दि.१ जूनला स्थानिक तक्षशिला नगर येथील सभागृहात करण्यात आला . ह्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व तथागत गौतम बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यर्पणाने झाली .ह्यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष एस एस वले, सरचिटणीस, बी.के हिवराळे, कोषाध्यक्ष, के. के .शेगोकार ,छायाताई बांगर, आर.आर.जवरे, शहर अध्यक्ष, माणिकराव वानखडे, तुकाराम रोकडे,अशोक वानखडे, भीमराव तायडे यांनी यावेळी संबोधीत केले. तालुका अध्यक्ष दिलीप मेढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या कार्यक्रमाचे संचलन, पंडीत इंगळे,सरचिटणीस, तसेच प्रास्ताविक कोषाध्यक्ष निरंजन तायडे व आभार प्रदर्शन अमोल मेढे यांनी केले. कार्यक्रमाला खामगांव तालुका अध्यक्ष, विनेश इंगळे, संग्रामपूर तालुका अध्यक्ष,भाऊराव गव्हांदे,जळगांव जामोद तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर यांची विशेष उपस्थितीती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत वाकोडे, हिम्मत गवई,सुनिल मेढे, संदेश वाकोडे, विजय मेढे, प्रवेश वाघ यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक उपासीका उपस्थितीत होत्या.