
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
टाकरखेड (नांदुरा) देि.३ टाकरखेड येथील रहिवासी स्व.सरदारसिंग शिवलाल सिंग जाधव यांचे पुत्र दिपक सरदार सिंग जाधव यांची मुंबई मंत्रालयात सहाय्यक कक्षअधिकारी वर्ग 2 या पदावर नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम पी एस सी) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना नियुक्ती मिळाली आहे. दीपक हा बालपणापासून शिक्षणात हुशार होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण टाकरखेड येथे तर पुढील शिक्षण बुलढाणा येथे पार पडले. त्याच्या नियुक्तीमुळे टाकरखेड गाव नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशामुळे सर्व स्तरातुन त्याचे कौतुक होत आहे. टाकरखेड वाशीयांसाठी त्याची नियुक्ती अभिमानाची बाब ठरल्याने गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. टाकरखेड हे गाव नांदुरा मोताळा रोडवरील शेंबा या गावापासून उत्तरेस तीन किलोमीटर आहे.