
दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- मौजे शेखापुर येथे महाराष्ट्र शासन कामगार विभाग योजने अंतर्गत सरपंच अतिक शेख यांच्या प्रयत्नाने मध्यान्ह भोजन योजना मौजे शेखापुर तालुका भुम येथे संपुर्ण कामगराना मोफत जेवन सुरू करण्यात आले आहे.
सदरील योजने अंतर्गत सुमारे शंभर डब्बे जेवण गोरगरीबांना देण्याची व्यवस्था करण्यात आलीआहे.समाजासाठी नेहमी धडपड करणारे समाजास आपल्याला कांही तरी देणे आहे हे ध्येय मनात घेऊन गोरगरीबांची जान असणारे युवा सरपंच आतिक शेख यांनी शासनाकडे विषेश प्रयत्न करुन ही योजना तालुक्यामधे सर्वात प्रथम मौजे शेखापुर येथे सुरु केली आहे.
सदरील योजना ही कामगरांना न्याय देणारी असल्याने सरपंच अतीक शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.