
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
नंदुरबार .जि लग्नाच्या रूढी परंपरेचे बंधनतोडून कोरोनाने मृत्यू झालेल्या भावांच्या पत्नीसोबत लग्नगाठ बांधली. नातेवाईकांच्या उपस्थिंतीत थाटामाटांत विवाह संपन्न झाला. या अनोखे लग्नांच्या बंधनाचा गावातील लोकांकडूंन कौतुकांचा वर्षाव झाला. नंदुरबार जिल्हा पोलिस ठाण्यांत कार्यरत असलेले महसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांना दोन मुली व एक मुलगा असे आपत्ते आहे. मोठी मुलगी हिचे लग्न झाले तसेच दुसऱ्या क्रमांकाची मुलगी चेतना हिला डी.एड पर्यंत शिक्षण पूर्ण करुन मुलगी चेतनाचे धुळे येथील रहिवासी उच्च शिक्षित पुणे येथे नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले संदीप चंद्रकांत बडगुजर यांच्याशी २०१५ साली मोठ्या थाटांत विवाह करुन दिला होता. दोघांचा संसार सुखांत चालू होता त्यांच्या संसार रुपी वेलीवर दिव्यांका नावांची कळी उमलली कुटुंबांत आनंद ,उत्सव चांगलाच साजरा झाला होता दिव्यांका ही पाच वर्षाची झाली कोरोना महामारीत संदीपचा पुणे येथे गेल्यावर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सुखी संसारावर दुःखांचा डोंगर कोसळला त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखांत बुडाले चेतना देखील पतीच्या विरहांने खेचून गेली त्यानंतर चेतनाचे वडील किशोर बडगुजर यांनी मुलगी चेतना व नात यांचा एक वर्ष सांभाळ करुन समाजांतील जेष्ठ ,श्रेष्ठ पदाधिकारी यांच्यासह सासर व माहेरकडील मंडळींनी चेतनांची समजूत घालून विचार विनिमय करुन चेतना व दीर हर्षल उर्फ किरण यांचा भावी जीवनाची भूमिका पटवून सांगत चेतना व हर्षल यांनी सर्वांचे मत विचारांत घेवुन खांद्याला खांदा लावून संसार थाटण्यांचा निर्णय घेतला. मुलगी दिवांका हिची सुद्धा दिर हर्षल यांनी घेतली जबाबदारी आणि चेतनाचा स्वीकार केला चेतनानेही दिरासोबत लग्न करण्यांस संमती दिली. या लग्न सोहळ्यांसाठी चेतनाचे आई वडील, हर्षलचे आई वडील नातेवाईक समाज बांधवांकडूंन पुण्यांत रुंढी परंपरानुसार मोठ्या थाटामाटांत विवाह लावून दिला