
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शिवसेनेच्या ताब्यात असलेली नगरपंचायत शिवसेनेच्या नगरसेवकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे.
नगरपंचायत मधील सि.वो हे नगरपंचायत मध्ये कधीच हजर नसतात तक्रारदारांनी कोणाकडे तक्रार करावी नवीन आलेले सि.वो हे कार्यालयात दुपारी तीन नंतर येतात व सामान्य नागरिकांना भेटत ही नाहीत. नागरिकाच्या पाण्याविषयी समस्या तक्रारी मग कोणाकडे द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे जर यावर निवारण नाही झाले तर लवकरच नगरपंचायती वार भांडे हांडे मोर्चा काढण्यात येईल असे नागरिकांची प्रतिक्रिया येत आहे .
मंठा- नगरपंचायत च्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यात शिवसेनेच्या नगरसेविका ही सुटल्या नाहीत नवनिर्वाचित नगरसेविका सौ सरोजताई बोराडे यांनाच खुद्द पाणी विकत घ्यावे लागत आहे.
तर सामान्य नागरिकाचे काय हाल असतील विचार करण्याची गोष्ट आहे. पाणीसाठा मुबलक असतानाही नगरपंचायत च्या उदासीनकारभारामुळ कारभारामुळे, आठ ते दहा दिवसाआड पाणी सुटत आहे. तर खूप काही भागात पाणी पुरवठा च होत नाही खूप वेळेस नागरिकांनी तक्रार करून देखील याची कोणी दाखल घेत नाहीये. नागरिकाच्या होणारे हाल लक्षात घेत नगराध्यक्ष सौ मिराताई बोराडे तात्काळ दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व नागरिकाच्या होणारे हाल टाळावेत.
नगरपंचायत ही गेल्या आठ वर्षापासून शिवसेनेच्या हातात एक हाती सत्ता ताब्यात आहे पण येथे खुद्द शिवसेनेच्या नगरसेविका सौ सरोजताई बोराडे यांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे तर सामान्य नागरिकांचे काय हाल असतील असा सूर नागरिकांतून निघत आहे पाणीसाठा मुबलक असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे सामान्य नागरिक हैरान झाले आहेत सध्या १००० लिटर पाण्यासाठी २०० दोनशे रुपये व ५०० लिटर साठी १०० रुपये द्यावे लागतात सामान्य नागरिकांना पाणी विकत घेणे परवडत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.