
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
ता कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहांत संपन्न झाला. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. माझ्या राजांचा शिवराज्याभिषेक मुठभर मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन दिल्लीला धाक दाखवून सिंहासन निर्माण करणाऱ्या सेनानायकांचा आज सुवर्ण सोहळा शिवराज्याभिषेक करंजखोप मध्ये उत्साहांत संपन्न झाला. यावेळी मा. सरपंच लालासौ नेवसे, माजी उपसरपंच मा. आनंदराव शिंदे (अण्णा) मा.धनंजय धुमाळ बापू ग्रामपंचायत सदस्य मा. राजेंद्र धुमाळ ग्रामपंचायत सदस्य मा. पांडुरंग धुमाळ (तात्या) मा.अरविंद शिंदे मा. विलास धुमाळ मा.राजेंद्र शिंदे मा.उद्धव धुमाळ मा.दत्तात्रय भोसले मा. नंदकुमार धुमाळ मा.बापु नेवसे (सदस्य) सातारा प्रतिनिधी मा.संभाजी पुरीगोसावी व करंजखोप जि.परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. ढमाळ सर यांच्यासह करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी कर्मचारी आदीं ग्रामस्थांची उपस्थिंती होती. यावेळी उपस्थिंतीत ग्रामस्थांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत सादर केले त्यानंतर भारत माता की जय, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणांचा गजर उपस्थिंतीत ग्रामस्थांनी दिल्या.