
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विकासकामांमधील गती आणि त्यांचr दूरदृष्टी यासाठी नावाजले जातात.
त्यांनी अनेकदा तरुणांना व्यवसाय आणि जागतिक नव्या संधी घेण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी त्यांच्या मुलाच्या नवीन व्यावसायाची माहिती दिली होती. दरम्यान, यावरुन समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या कमाईचा आकडा आणि हिशोब ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल गडकरी यांच्या कमाईवरुन अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. निखिल गडकरी यांनी सियान अग्रो इंडस्ट्रीज अन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अवघ्या दीड महिन्यामध्ये या निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये चौपट वाढ झाली आहे. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर याबाबत पोस्ट करुन त्यांनी संपूर्ण गणित मांडले.
माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये इतकं आहे’, असं वक्तव्य गडकरी यांनी अलीकडेच केले होते. त्याच वक्तव्याचा दाखला देत दमानिया म्हणाल्या की ‘गडकरी स्वतःला खूप कमी लेखतायत. त्यांचा मुलगा तर दिवसाला १४४ कोटी रुपये कमावतोय.’ यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निखिल नितीन गडकरी यांच्या कंपनीचा लेखाजोखा मांडला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या मुलाची सियान अॅग्रो नावाची कंपनी आहे. २५ जून रोजी सियान अॅग्रोमध्ये १,८९,३८,१२१ प्रमोटर होलडिंग शेअर्स होते. या शेअरच्या किमतीत आज ७६ रुपपांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका दिवसात १४३.९२ कोटी रुपये त्यांनी कमावले निखील व सारंग गडकरी दिवसाला इसके पैसे कमावत आहेत, असा टोला अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून लगावला आहे.