
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री.रमेश राठोड
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या चिंचबर्डी येथील गावातील चिमुकल्या खेळतांना बाॅल कुलरच्या टप्प्यात पडल्यामुळे विराज दिलीप चव्हाण वय ८ वर्ष हा चिमुकला आपल्या मित्रासोबत घरात खेळत असताना हातातील बाॅल कुलरच्या टप मध्ये पडल्याने,बाॅल काढण्यासाठी टपमध्ये हात घातल्याने कुलरचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, आई-वडिलांना एकुलता एक असल्याने त्यांच्या निधनाने सावळी सदोबा परिसरामध्ये आजुबाजुच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूळा पसरली आहे