
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री. रमेश राठोड
(खडका येथे बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामांमध्ये भरल्यात जात आहे मोठ-मोठी दगडे)
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सावळी सदोबा-आर्णि पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा खडका आदिवासी बाहुबल ग्रामपंचायतीमध्ये मागील काही दिवसापासून प्रशासकाची नेमणूक असून याच गावांमध्ये जिल्हा परिषद सिंचन विभागा अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन अंदाजे सतरा ते अठरा लाख रुपये किमतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात येत असुन,बांधण्यात येणाऱ्या या सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ-मोठी दगडे भरून कामे करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,सदर बांधकाम थातूरमातूर करून निधी हडपण्याचा प्रकार येथे चालू असल्याचं पाहायला मिळत आहे,सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट व बोगस होत असुन या कामाची चौकशी करून दोषी ग्रामपंचायत व अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी व होणारे बंधाऱ्याचे बोगस बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी खडका ग्रामवासी यांनी केली आहे.सिंचन उपविभाग दारव्हा यांच्या अंतर्गत सावळी सदोबा परिसरामध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अशीच अनेक बोगस कामे सुरु असल्यानचे नागरिकांकडून ऐकण्यात येत आहे.