
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गरजेप्रमाणे समाजात लोकोपयोगी कामे केली त्याप्रमाणे युवकांनी आजच्या जगात वावरताना गरजूंना यथाशक्ती मदत करावी. अन्यायाच्या विरोधात उभे राहून पीडितांना न्याय मिळवून द्यावा. भविष्यातील गरजा ओळखून लोकांना मार्गदर्शन करावे. हीच खरी अहिल्या मातेच्या विचाराची जयंती ठरेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे केंद्रीय मुख्याध्यापक व्यंकटराव गोपाळराव कोकणे गुरुजी अतनूरकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी.जयंती अतनुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात अहिल्या मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यंकटराव कोकणे, ऊधोजक राजाराम गोपाळराव कोकणे, भारतीय काँग्रेसचे जळकोट तालुका सचिव गोविंद गोपाळराव कोकणे, रघुनाथ मुंडकर, दिलीप कोकणे, सुनील कोकणे, लक्ष्मण कोकणे, संगमेश्वर कोकणे, दिगांबर कोकणे, कृष्णा कोकणे, तानाजी सोमुसे, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष एस.जी.शिंदे, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अविनाश शिंदे, महाराष्ट्र ग्राहक पंचायत राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, तसेच अतनुरातील विविध सामाजिक संघटना, मजदूर संघटना, धनगर व हटकर समाज महिला मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक होळकर यांना जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली. सर्वप्रथम अहिल्या मातेच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना संजय शिंदे म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी या कुशल प्रशासक होत्या. अनेक लोकहिताची कामे त्यांनी केली. भारतात अनेक सामर्थ्यवान स्त्रिया होऊन गेल्या त्यापैकी एक म्हणून आहिल्यादेवीची गणना होते.