
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
विश्वकर्मा पांचाळ सोनार (सुवर्णकार) समाज, पुणे चे आयोजन
पुणे :- भारतीय हिंदू संस्कृती मधील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा समजला जाणाऱ्या उपनयन संस्कारासाठी पुण्यातील विश्वकर्मा पांचाळ सोनार (सुवर्णकार) समाजाकडून सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत माफक दरात एकूण ५५ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले.
पुण्यातील कात्रज भागातील त्रिमूर्ती गार्डन येथे नुकतेच सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण पुणे शहरासह जिल्ह्यातील बटूंचा यामध्ये सहभाग होता.अत्यंत नियोजनबध्द झालेल्या या सोहळ्याची सुरवात श्रीगणेश पूजन करून करण्यात आली त्यानंतर बटूंचा हळदी समारंभ पार पडला या सोहळ्यातील मातृभोजनाच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानिमित्ताने सर्व बटूंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. व्रतबंध सोहळा सामुदायिक असतानाही सर्व मुंजी ठरलेल्या मुहूर्तावर पार पडल्या त्यामुळे बटूंच्या पालकांकडून आयोजकांचे विशेष कौतुक होताना यावेळी पाहावयास मिळाले. या कार्यक्रमाला समाज्यातील महिला व जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व बटूंना आशीर्वाद देण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते संजय जाधव,झी मराठी वरील मन झाल बाजिंद फेम अभिनेता रियाज मुलानी तसेच घेतला वसा टाकू नको फेम अभिनेत्री हर्षदा तोंडीलकर हे उपस्थित होते तर नगरसेवक वसंत मोरे,विशाल तांबे,रविंद्र धंगेकर,योगेश समेळ,साईनाथ बाबर, तसेच सामाजिक कार्यकर्ते भगवान खेडेकर, चेतन मांगडे यांचेसह अनेक मान्यवरांनी यावेळी सर्व बटूंना आशीर्वाद दिले. यावेळी बोलताना समाजाचे अध्यक्ष आशिष पंडित यांनी सांगितले कि,या कार्यक्रमाला समाज्यातील आणि समाज्याच्या बाहेरीलही दानशूर व्यक्तिंनी मदत केल्यामुळेच एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला
संपूर्ण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुण्यातील विश्वकर्मा पांचाळ सोनार (सुवर्णकार) समाजाचे अध्यक्ष आशिष पंडित,उपाध्यक्ष मनोज भावेकर,सचिव लक्ष्मण पाटणकर यांचेसह केतन दिक्षित, दिपक महामुनी,मुकुंद अटपाळकर,सचिन दिक्षित,अमित भावेकर,अभिजित दिक्षित,योगेश महामुनी,उत्तम भावेकर यांनी विशेष मेहनत घेतली.