
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
फलटण ग्रामीण पोलिसांनी फलटण आणि वाजेगावच्या हद्दीत किराणा दुकानांमध्ये छापा टाकून सुमारे १ लाख३३ हजार४७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून वाजेगाव निंबळक (ता. फलटण) गावच्या हद्दीत केशव विठोबा गायकवाड हा त्यांचे सुरज किराणा जनरल स्टोअर दुकानांमध्ये गुटख्याची चोरटी विक्री करत असल्यांची माहिती पोलिसांना मिळाली त्या ठिकाणी छापा टाकला असता दुकान ची बाहेर असलेल्या जिन्याखाली२१ हजार ७९८ रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपी केशव विठोबा गायकवाड (वय ६०रा . वाजेगाव निंबळक ता.फलटण) यांस प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी फलटण यांच्या कोर्टातून पोलीस कोठडी मंजूर केली कोठडीत त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कुठ आहा गायकवाड यांनी फलटण येथील संतोष जोशी यांच्या दुकानांतून घेवुन आलेची माहिती त्यांने पोलिसांना सांगतिली त्यानंतर संतोष जोशी यांच्या दुकानात गेल्यावर दुकानच्या शेजारी असलेल्या गोदाममध्ये एकूण १ लाख११ हजार ६७३ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला संबंधित मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनविणे, पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे , महिला पोलीस उर्मिला पैदास, दादासो यादव आदीं पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.