
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरातील एक अतिशय प्रेरणादायी ज्वलंत उदाहरण असलेले विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ज्यांची गणना केली जाते असे एकमेव लोहा नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष, विकासाभिमुख नेतृत्व नगरसेवक करीम मोहद्दिनसाब शेख यांचा जन्म जुना लोहा येथे दिनांक ११जुन १९७६ रोजी झाला.घरची परिस्थिती अतिशय हलाखीची,तीन भाऊ, चार बहिणी अतिशय खडतर असा जीवन प्रवास. अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून एक बांधकाम गुत्तेदार असणारा मुस्लिम समाजातील सामान्य माणूस, लोह्यासारख्या शहरांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम आयुष्यभर करत आलेला आहे.
बांधकाम गुत्तेदार ते नगरसेवक नगरपालिकेचा पाणीपुरवठा सभापती असा अत्यंत खडतर व यशस्वी प्रवास राजकीय क्षेत्रातील भल्याभल्यांच्या भुवया उंचावून टाकणारं ठरला. त्यांच्या अंगी असलेली इमानदारी, लिनता,संयम, सहनशीलता, वचनपूर्तीचा ध्यान, सर्वधर्मियांना सोबत घेऊन चालणारी वृत्ती, स्वच्छ प्रतिमा, सामाजिक कार्याचा रक्तातच असलेला गुण यामुळे जनसामान्यांत अतिशय लोकप्रिय ठरलेले एकमेव नेतृत्व म्हणजे करिम शेख लोक आदराने त्यांना शेठ सुद्धा म्हणतात.
पुर्वीचे करीम शेख बांधकाम गुत्तेदार ते आत्ताचे करिम शेठ हे केवळ आणि केवळ स्वतःच्या अंगातील सुप्त शक्तीचा, असंख्य कामगारांच्या व्यथा वेदना, त्यांच्या सुखदुःखात वेळोवेळी धावून जावुन बांधकाम व्यवसायात मजल मारली,उत्तूंग भरारी घेतली.जुना लोहा या जन्म स्थळी वार्ड क्र.१५ मध्ये २००८ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवून स्वतः च्या कामाच्या व वैयक्तिक सर्व सामान्य लोकांच्या मध्ये वावरल्यामुळे, मुस्लिम धर्मियांबरोबरच सर्वधर्मियांनी भरपूर प्रेम दिले व पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर पाणी पुरवठा सभापती झाले. विकास कामांचा आलेख उंचावत गेल्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी कामगार यांना आपला हक्काचा माणूस म्हणून वाटत होते.यश अपयश पचवत सतत अविरतपणे जनतेच्या सेवेसाठी हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून प्रत्येकाच्या मनात रूजला गेला.नंतर २०१८ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार पणे विजय संपादन करून लोहा पालिकेच्या सभागृहा चे गटनेते म्हणून विराजमान होवून मुस्लिम धर्मियांबरोबरच सर्वधर्मियांचे नेतृत्व करणारा विकासाभिमुख चेहरा म्हणून ऐतिहासिक नोंद करणारा नगरसेवक ठरला.
प्रभागाबरोबरच शहरातील रस्ते,पाणी, सभागृह,धार्मिक सलोख्याचे वातावरणासह मुस्लिम शादीखाना प्रश्न,प्रभागाबरोबरच शहराचे सुशोभीकरण, सामाजिक उपक्रम हाती घेत सर्व मुस्लिम संघटनांना एकत्रित करणे असे अनेक प्रश्न, समस्या हाताळून, वेगवेगळ्या जयंती, उत्सव,अतिशय उत्साहात साजरे करून भल्याभल्यांना लाजवायचे काम केले.अनेक विकास कामे करून प्रगतीपथावर नेत असल्याने त्यांची लोकप्रियता शहरातच नव्हे तर तालुका जिल्हा भरात नावारूपाला आलेली आहे.हे कुणालाही नाकारून चालता येत नाही. करीम शेख यांनी आपली समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली.अनेकाच्या रोजगाराचा प्रश्न मिटवल्याने त्यांना कामगार नेता म्हणून ही वेगळी ओळख निर्माण केली.अतिशय संघर्षशाली खडतर असा प्रेरणादायी राजकीय प्रवास भल्याभल्यांना चिंतन करणारा विषय ठरलेला दिसून येत आहे.
करीम शेठ यांनी सामाजिक कार्य करत असताना कोरुना सारख्या अतिशय गंभीर संकटात जिवाची पर्वा न करता गोरगरीब दीनदलित यासह सर्व स्तरातील महिला पुरुषांना मदतीचा हात देऊन अन्नदान घडवून आणले ही गोष्ट इतिहासात नोंद करणारी आहे अनेक असाह्य महिला त्याचबरोबर विधवा यांना विविध योजनेच्या लाभ देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.
करिम शेठ यांचा आज दिनांक ११ जुन रोजी वाढदिवस त्यांना पुढील आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा.