
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांना पेरणीमध्ये डीएपी खत मिळावा, यासाठी कृषी विभागाच्या समन्वयातून प्रशासनाने एक हजार सातशे टन डीएपीचा संरक्षीत साठा केला होता. सध्या जिल्ह्यात काही भागात डीएपी मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने एक हजार टन डीएपीचा साठा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना वितरण करण्यात आला.
जिल्ह्यात खरिपात हंगामात शेतकरी सोयाबीन, कपाशी, उडीद, मुग यासह बागायती पिकांना डीएपी खत देतात. खरिपात सर्वाधीक डीएपीचा वापर होत असल्याने कृषी विभागाकडून दरवर्षी या खताचा संरक्षीत साठा केला जातो. यंदाही एक हजार सातशे टन डीएपीचा साठा करण्यात आला होता. यापेकी एक हजार टन डीएपी नुकताच वितरीत करण्यात कर्मचाऱ्यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करण आला. जून महिन्यातही साडेआठ हजार डीएपी खत वठा
आला आहे. हा खत कृषी विभागाच्या
जिल्ह्याला होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत कमी
रेल्वे रिस्ट्रक्शनमुळे अडथळा
जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या रासायनिक खताच्या पुरवठ्याला रेल्वे रिस्ट्रक्शनमुळे अडथळा येत असल्याची माहिती खत बाजारातून मिळाली. परिणामी शेतकऱ्यांना डीएपी व १०:२६:२६ खतासाठी भटकावे लागत आहे. ऐन पेरणीच्या हंगामात खतासाठी शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रशासनाने मात्र रेल्वे रिस्ट्रक्शनची अडचण नसून जून महिन्यात साडेआठ हजार टन डीएपीसह इतर संयुक्त खताचा पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जूनमध्ये उपलब्ध होणार डीएपी
जूनमध्ये जिल्ह्याला आठ हजार २४० टन डीएपी खत मंजूर आहे. हे खत पुढील काही दिवसात मिळणार आहे कोरोमंडल १५०० टन, चंबल फर्टीलायझर टन, आरसीएफ १००० टन, आयपीएल २५४० टन असा डीएपी
तालुकानिहाय वितरीत डीएपी (टनामध्ये)
• नांदेड : ७१ हदगाव : ५४
मुखेड : ८२ किनवट ७६
हिमायतनगर ४३
माहूर ५१ भोकर ४ ६३
• नायगाव ७१ मुदखेड ५८
• कंधार : ७४ लोहा : ७१
देगलूर : ६२ बिलोली ५९
अर्धापूर : ४३ उमरी ४४
• दर वाढल्याने २०:२०:० मागणी घटली
जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकासाठी २०:२०:० या खताची वापर करतात. परंतु यंदा २०:२०:० या खताची किंमत एक हजार ४५० रुपये प्रतिबॅग झाली आहे. तर डीएपी एक हजार ३५० रुपयांना मिळत आहे. तुलनेत किंमत कमी तसेच अन्नद्रव्याचे प्रमाण अधीक असल्याने शेतकरी यंदा २०:२०:० खताऐवजी डीएपीकडे वळला आहे. परिणामी २०:२०:० खताची मागणी घटून डीएपीची वाढल्याने बाजारात गोंधळ उडाला आहे.