
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पाण्यामध्ये असणारी नाव ज्या प्रमाणे पाण्यात असुन सुद्धा नावेत पाणी प्रवेश करू शकत नाही. आणि नाव आपला जो नियोजित प्रवास आहे तो योग्य पद्धतीने कुठल्याही संकटा शिवाय पुर्ण करते . त्याच प्रमाणे आपण सुद्धा मानवी जीवन जगत असताना व या माया रूपी संसारात वावरताना तसेच या जगात फिरत असतान आपल्या आजूबाजूला असणार भौतिक मायारूपी पाणी हे आपल्या संसार रूपी नावे मध्ये प्रवेश करू शकले नाही पाहिजे तसेच बाह्य वातावरणाचा तसेच भौतिक जगाला आपल्या मध्ये प्रवेश करू दिला नाही पाहिजे. म्हणजे आपलं जीवन हे नावे प्रमाणे असावं आपण पाण्या मध्ये चालणारी नाव कधी पाहिली आहे का पाहिली असेल तर लक्षपूर्वक आठवा तिचा थोडासाच पृष्ठ भाग पाण्यात असतो . आणि वरच्या बाजुचा बहुतांश भाग हा पाण्यावर तरंगतो म्हणजे नेमके काय तर पाण्यावर समतोल साधण्यासाठी जे काला गुण आवश्यक आहेत. ते काला गुण नावे ने आवगत केले आहेत . पाण्यावर तरंगत प्रवाहाच्या दिशेने नाव हळूहळू मार्गस्थ होते आणि आपल्या नियोजित मुक्कामाचे असणारे शेवटचे ठिकाण गाठते . त्याच प्रमाणे मानवाने सुद्धा आपली जीवन रुपी नाव हि मायारूप पाण्यात अशाच पद्धतीने तरंगायला हवी . जेणेकरून आपण मायारूपी जगात जीवन जगत असताना विविध साधनांचा वापर हा आपल्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. परंतु हा वापर करून घेत असताना आपल्याला निरपेक्ष भावनेने पुढे जाता आलं पाहिजे. आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे . पोहोचत असताना या मायेच्या संसारिक गोष्टींना आपल्यामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही.हेच महत्वाचे आहे जसं पाण्यात चालणारी नाव ही आपल्यामध्ये समुद्रातील अथांग पाणी शिरू देत नाही. त्याच प्रमाणे संसाराच्या पैलतीरावर जात असताना मायारूपी शक्ती चा प्रवेश आपल्या मध्ये झाला नाही पाहिजे .पाण्यात चालणारी नाव त्यामध्ये जर पाणी शिरले तर ती बुडण्याची दाट शक्यता असते .त्याच प्रमाणे संसार रुपी जीवनामध्ये जगत असताना त्या मध्ये मोहमाया सिरली तर संसार रुपी नाव हि नक्कीच बुडल्याशिवाय राहत नाही .आणि त्यामुळे जीवनातील मुक्ती चा प्रवास हा त्याच ठिकाणी थांबतो. हा प्रवास थांबवायचं नसेल आणि आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर जीवन हे पाण्यात चालणाऱ्या नावे प्रमाणे असलं पाहिजे . आणि नियोजित ठिकाणी नावे ज्याप्रमाणे पोहचते त्याच प्रमाणे आपल्या आपल्या जीवनातील सर्व जबाबदारी कर्तव्य पुर्ण करुन पार पाडुन योग्य ठिकाणी पोहचता आलं पाहिजे .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301