
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
सविस्तर वृत असे कि आज भुम येथे नुपूर शर्मा व तसेच नविन जिंदल यांनी हजरत महंमद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपाहॅ वक्तव्य केल्याबद्ल त्याचा विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला व तसेच मा उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा गृहमंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले.
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवी दिल्लीचे भाजपा मीडियाप्रमुख नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई व्हावी यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला.
भारत देशामध्ये नुपूर हिच्या वक्तव्यामुळे हिंसक आंदोलने होत आहेत. तसेच भारत देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नाचक्की झालेली असून अनेक देशांनी नुपूर हिच्या हीन वक्तव्याची कठोर शब्दात निंदा करुन निषेध नोंदवला आहे. नुपूर शर्मा हिने जाती-जातीमध्ये द्वेष पसरविण्याच्या उद्देशानेच हे वक्तव्य केलेले असून तिच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक सलोखा, भाईचारा संपुष्टात येऊन दोन धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे.
देशात जातीधर्मावर टिकाटिप्पणी आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका करणार्यांना कडक शासन करावे असे निषेध मोर्चा भुम येथे काढुन प्रशासनास निवेदन देण्यात आले.
यावेळी आसिफ जमादार,मुशीर शेख, तोफीक कुरेशी, आखतर जमादार, सिराज मोगल,फीरोज शेख, बबलु बागवान, मामु जमादार, शेख रहीम चाचा, ईसाक बागवान, महंमद पटेल, साजिद मौलाना, बब्बु कुरेशी, सापवाले बिरादरी, समिर मोगल, भुम शहरातील कसबा, इंदीरानगर, गराडा गल्ली, कुरेशी गल्ली, बागवान गल्ली येथिल युवक व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.