
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.१६.नांदुरा-मोताळा रोडवर नाली बांधकाम व रोड रूंदीकरणाचे काम सुरु आहे.रेल्वे स्टेशन चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत एक साईडचा रस्ता खोदुन तब्बल महिना -दिड महिना झाला परंतु काम काही पुढे जात नाही. त्यामुळे वाहनधारक आपली वाहने त्या खाली जागेवर ऊभी करतात.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाने वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली काय ? असा प्रश्न रोडवरील वाहनांची गर्दी पाहिल्यानंतर वाटते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरात कुठही वाहन पार्किंगची व्यवस्था नाही.मोठमोठे काॅम्प्लेक्स बांधून झाले त्यांचीही अवस्था तशीच आहे. त्यामुळे लोकांना कुठतरी आपले वाहन उभे करावे लागतात व आपली घरगुती सामन खरेदी ,बॅंक व इतर कामे करावी लागतात . मागील दोन महिन्यापासून नांदुरा-मोताळा रोडवर नाली बांधकाम व रोड रूंदीकरणाचे काम सुरु आहे. डीव्हायडरच्या एका बाजूचा रोड खोदून मुरूम आंथरलेला असुन दिड महिना उलटला तरी कामाला मात्र मुहूर्त सापडत नसल्याने काम जैसे ते आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था इतरत्र कुठे नसल्यामुळे वाहनधारक आपली वाहने खोदलेल्या जागेवर पार्किंग करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाने एक चांगला वाहनतळ उपलब्ध करून दिल्याबद्दल वाहनधारक मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाला मनापासून धन्यवाद देत असतील एवढं मात्र खरं !
मोतीपुरा येथील नालीचे बांधकाम सुमार दर्जाचे
नांदुरा-मोताळाु रोडवर मोतीपुरा येथील नालीचे बांधकाम सुरू आहे.गुन्यात काम करीत असताना नालीची रूंदी कमी होऊ नये म्हणून अशाप्रकारे काम सुरू आहे.अर्थात रोडची रूंदी कमी झाली तरी चालेल. त्यामुळे कीती सुमार दर्जाचे काम सुरू आहे यावरून यांची कल्पना येते. वरीष्ठ अधिकारी याची दखल घेतील काय?