
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:गेल्या काही वर्षापासून भाविकभक्तासह प्रवाशांची असलेली मागणी आता पुर्ण झालेली असून बिलोली बस आगाराची बिलोली ते शेगाव ही बससेवा दि. १४ जून या वटपोर्णीमेच्या शुभ मुहर्तावर सुरू करण्यात आली आहे.सर्व प्रथम एम.एच.२०-ईएल-२२५३ या बसची पूजा करून बसचे चालक अविनाश गायकवाड वाहक सदानंद जाधव यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तदनंतर सकाळी ठिक ९.४५ वाजता ही बस शेगावकडे रवाना झाली आहे.सदर बस बिलोली नरसी नांदेड वसमत औढा हिंगोली सेनगाव रिसोड मेहकर खामगाव मार्ग शेगाव येथे सांयकाळी ७.३० वा.पोहचेल परत दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वा.शेगाव येथून बिलोलीच्या दिशेने रवाना होईल.या वेळी प्रामुख्याने आगार प्रमुख एस.डी.पवार,वाहतुक निरिक्षक ओ.एस.इंगोले,राजेश कदम,भोसले पाटील दौलतापुरकर, पोटे, मादनवाड संदिप जाधव व प्रवासी उपस्थित होते.