
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – धाराशिव साखर कारखाना शिवणी जामगा येथील ऊसाचे बील १५ फेब्रुवारी पासुनचे आद्याप शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले नाही तात्काळ शेतकऱ्यांना ऊसाचे बिल वाटप करावे अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी केली आहे.
शिवणी येथील साखर कारखान्याचे १५ फेब्रुवारी पासूनचे बील अद्याप शेतकऱ्यांना खात्यात जमा केले नसुन शेतकरी कारखान्यात बिलाची चौकशी करण्यासाठी गेले असता उद्या जमा होतील आठ दिवसांत जमा होतील अशी उडवा उडवीची उत्तरे कर्मचारी शेतकऱ्यांना देत आहेत. दोन वर्ष कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या शेतीमाला व्यवस्थीत भाव नाही , त्यामुळे शेतकरी अडचणीत आला व कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांचे ऊसाचे बील जमा केले नसुन शेतकऱ्यांची अवस्था कारखान्यात हेलपाटे मारण्यात हतबल झाल्यासारखी दिसत असुन , कारखान्याच्या ह्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असुन तात्काळ शेतकऱ्यांचे ऊसाचे बील खात्यावर जमा करावे अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी निवेदनाद्वारे नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण , जिल्हाधिकारी , धाराशिव साखर कारखाना शिवणी जा येथे केली आहे.