
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मोखाडा:- ग्रामपंचायत बेरीस्ते येथील मुकुंदपाडा गावातील विहीर दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
मुकुंदपाडा गावासाठी नदीतून सोलर पंप द्वारे पाणीपुरवठा केला जातो परंतु पावसाळ्यातील चार महिने नदीला पूर असल्याने नदीतून मोटर बाहेर काढून ठेवली जाते, गावात विहीर आहे परंतु त्या विहिरीत पावसाचे पाणी विहिरीत जात असल्याने सदर पाणी पिण्यास योग्य नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे होते आणि गावकऱ्यांनी सदर विहीर दुरुस्ती करिता प्रशासक श्री सुर्यवंशी यांचे कडे मागणी केली.
प्रशासक श्री सुर्यवंशी यांनी सदर विहिरीची पाहणी करून तात्काळ विहीर दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आणि गावकऱ्यांना विनंती केली की सदर विहीरीचे पाणी तुम्हीच गावकरी पिणार आहेत म्हणून दुरुस्तीचे काम गावातील लोकांनी केल्यास उत्कृष्ट दर्जाचे काम होईल आणि गावातील लोकांना रोजगार देखील मिळेल असे प्रशासक यांनी गावकऱ्यांना सुचविले आणि गावकऱ्यांनी सदर काम हाती घेऊन काम पूर्ण केले.
प्रशासक श्री सुर्यवंशी यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि काम चांगल्या प्रतीचे झाले बाबत समाधान व्यक्त केले.
गावकरी प्रतिक्रिया- नामदेव भोये
यापूर्वी आमच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही परंतु प्रशासक श्री सुर्यवंशी यांनी जेव्हा पासून प्रशासकाचा पदभार घेतला तेव्हा पासून आमच्या गावात 4 वेळा येऊन आमच्या समस्या ऐकून त्या निकाली लावण्याबाबत प्रयत्न केले, विहीर दुरुस्ती बाबत सांगितले असता त्यांनी आमच्या हाताला काम देत तुम्हीच सदर दुरुस्ती करा म्हणजे काम चांगले होईल आणि आम्हाला रोजगार मिळेल असे सांगितले. आमच्या गावात यायला रस्ता नाही नदी ओलांडून यावे लागते हे जेव्हा प्रशासक यांनी बघितले त्यांनी लगेच ग्रामसभेत ठराव रस्ता आणि पूल बांधकाम बाबत ठराव घेतला. जोपर्यंत श्री सुर्यवंशी आमचे प्रशासक आहेत तोपर्यंत आमचे सर्व काम होतील अशी आमची गावकर्यांची अपेक्षा आहे.
मोखाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील सर्व गाव पाडे फिरलो असल्याने मला मुकूंदपाडा गावात जायला रस्ता नाही म्हणून नदी ओलांडून जावे लागते तेही पावसाळा संपल्यावर याची कल्पना आधीपासूनच होती म्हणून प्रशासकाचा पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच ग्रामसभेत मुकुंदपाडा गावात जाण्यासाठी रस्ता आणि पूल व्हावा असा ठराव घेतला होता, ज्यावेळी गावात गेलो तेव्हा लोकांना समस्या विचारल्या असता त्यांनी विहीर दुरुस्ती करून दिल्यास आमची पावसाळ्यातील पाण्याची समस्या सुटेल असे सांगितले असता सदर काम गावातील लोकांना करण्यास सांगितले कारण ते स्वतः पाणी पिणार आहेत म्हणून काम चांगले करतील आणि त्यांना रोजगार देखील मिळेल अशी माझी इच्छा होती त्याप्रमाणे गावातील लोकांचे काम बघून खूप समाधान वाटले.
श्री तुषार सुर्यवंशी, प्रशासक बेरीस्ते ग्रामपंचायत