
दैनिक चालु वार्ता धडगांव प्रतिनिधी-विरेंद्र वसावे
धडगांव : धडगांव तालुक्यातील कुंडलमालपाडा ( कुंडल ) दुर्घटनेतील तिन मयत मुलांचा परिवारांना शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे सांगत पालकमंत्री अॅड . के.सी. पाडवी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत दूरध्वनी चर्चा करून शासकीय मदती साठी लागणारे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत .
धडगाव तालुक्यातील कुंडलमालपाडा येथे किराणा वस्तू घेण्यासाठी एक किलोमीटरवर हेंगलापाडा येथे जावे लागते . नेहमीचाच रस्ता असल्याने मजुरी व शेती करणारे कुटुंब आपल्या चिमुकल्यांनाच दुकानावर पाठवत असतात . देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावर दुकानात जात असतांना खोल खड्डयात पडून तिघा लहान मुलांचा मृत्यू झाला होता .
निलेश दीलवर पाडवी वय ४ वर्षे , मेहेर दिलवर पाडवी वय ५ वर्ष , आणि पार्वती अशोक पाडवी वय ५ वर्ष , यांचा मृत्यू झाला होता . घडलेल्या घटने नंतर पालकमंत्री ना . अॅड के.सी. पाडवी यांनी सदर दुर्घटनेचा संदर्भात तहसील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत दूरध्वनी चर्चा करून शासकीय मदती साठी लागणारे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत . या तिघा लहान मुलाच्या परिवाराला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी यांनी दिले आहे . या परिवाराच्या पाठीशी पूर्ण संवेदना असून त्यांना पूर्ण शासकीय मदत मिळवून देण्याचा सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .