
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
दिनांक ०७/०६/२०२२रोजी दुपारी १२वाजता पिंपळशेत ग्रामपंचायत मधील आशाकार्यकर्ता व अंगणवाडी कार्यकर्ता यांची मिटिंग लावली होती त्या प्रमाणे पीडित महिला ही त्या मिटिंग मध्ये हजर होती ही मिटिंग दुपारी १ वाज्याच्या सुमारास संपली मिटिंग संपल्या नंतर बाकी महिला कार्यकर्त्या निघून गेल्या पण पीडित महिला घरी जात असतांना ग्रामसेवक यांनी सदर महिलेस तुमच्या गावातील विहिरीचे काम चालू आहे त्या बाबत आपल्याशी बोलायच आहे असे सांगून महिलेस कॅबिन मध्ये बोलावले कामच विचारून झाल्या नंतर पीडित महिलेस एकटी पाहून ग्रामसेवक सुनील गायकवाड याने संधीचा फायदा घेऊन महिलेस तू मला आवडते तू उद्या जव्हारला असे बोलत होता त्या वर पीडितेने काय काम आहे का जव्हारला अस विचारलं असता काही काम नाही तू मला आवडते म्हणून तुला बोलावतो व सदर महिलेस पैसे दाखवून लालच दाखवण्याचा प्रेयत्न करत होता त्या वर त्या महिलेस ह्या ग्रामसेवकाची लक्षणे विचित्र वाटली असता पीडित महिलेने लगेचच तिथून पळ काढला व आपल्या घरी जाऊन घरच्यांना वरील हकीकत सांगितली ,सदरचा प्रकार कोणाला सांगितल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली परंतु महिलेने खंबीर होऊन पूर्ण हकीकत आपल्या नवऱ्याला व घरच्यांना सांगितली घरच्यांनी लगेचच जव्हार पोलीस स्टेशन येथे जाऊन सगळा प्रकार सांगितला व ग्रामसेवक सुनील गायकवाड याच्या वरती गुन्हा नोंदवण्यात आला आहे.