
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर प्रतिनिधी.
वाडा तालुका
भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान, शिव भवानी सेवा ट्रस्ट विरार व आपले मानव अधिकार फाऊंडेशन तसेच माझं माहेर सेवाभावी संस्था,श्री.स्वामी समर्थ शिव मंदिर केंद्र विरार.व मुक्ताई न्यान प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील नेहाळी सारख्या अतिदुर्गम भागात शैक्षणिक साहित्य व महिलांसाठी साडी वाटप करण्यात आले.विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका येथील अति दुर्गम गावांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप तसेच महिलांना साडी व घरगुती भांडी, लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खास करून दूर डोंगर दऱ्यांत वस्तीमध्ये असलेल्या गावात अनेक सुविधा उपलब्ध नाही व तेथील ग्रामस्थांचे हाल होत असतात त्यांचे जीवन शेती व मोलमजुरी यावर अवलंबून असते.अश्या बिगारी व शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अनेक वेळा गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते अशा गावातील लोकांच्या संपर्कात येऊन अतिदुर्गम भागात काही मदत मिळावी म्हणून अर्ज आला होता. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थांना एकत्र करून करून 20 सप्टेंबर रोजी येथील गावातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, खाऊवाटप, भांडी वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई रोहिदास शेलार ,भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष
दिनेश भोईर, महिला अध्यक्षा सौ दिशा दिनेश भोईर, भवानी सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पाटील, आपले मानव अधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ दीपेश पष्टे,श्री.स्वामी समर्थ शिव मंदिर केंद्र विरार संस्थापक अध्यक्ष पवार सर, मुक्ताई न्यान प्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष कमलाकर पाटील, जनसेवा सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष नरेश जाधव ,
तसेच सागर पाटील, मुकुंद जगताप,जि.प.
शाळेचे शिक्षक भरत पाटील सर यांनी उत्तम सुत्रसंचलन केलं.गावचे ग्रामस्थ भिकाजी तसेच दाढरे गावचे ग्रामस्थ, तरुण पिढी यानी सेवा भावी उपक्रमा साठी हातभार लावला.या कार्यक्रमा साठी गावकरी उपस्थित होते.