प्रतिनिधी : स्वाती हडकर
चिपळूण : शहरालगत असलेल्या खेंड – पाच पांडव रोडवरील बायपासजवळील डोंगराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे आगीमुळे झाडे-झुडपे व वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा भाग डोंगराळ असून त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्याने आग विझवणे कठीण ठरत आहे.
आग वेगाने पसरत असल्याने शेतकरी व स्थानिक नागरिकांसमोर ती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असून प्रशासनानेही तातडीने लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
