
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी -गोविंद पवार
लोहा शहरांचा चौफेर विकास सुरू असल्याची माहिती लोहा न.पा.चे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी पत्रकारांशी चाय पे चर्चा करताना दिली.
लोहा शहर व तालुक्यात समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे आज दिनांक ७ जुलै रोजी लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी लोहा न.पा.त त्यांच्या दालनात लोहा येथील पत्रकार बांधवांना चहा पाणी पिण्यास आमंत्रित केले होते.
यावेळी चहा पाणी झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या लोहा शहरात आता पर्यंत झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
तसेच राज्यात भाजपा – सेना युतीचे सरकार आले असल्यामुळे नुतन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच लोहा शहरात आमचे नेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोहा न.पा.च्या वतीने चौफेर विकास कामे करीत आहोत तसेच राज्यात सत्तांतर झाले असून आमचा भाजपा पक्ष हा राज्यात पुन्हा सत्तेत आला असून नुतन पालकमंत्री नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून उर्वरित विविध विकास कामे पूर्ण करणार असल्याची ग्वाही लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिली.