
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
उदगीर
दि.१ जुलै रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 जूलै हा दिवस माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती निमित्ताने कृषी दिन म्हणून साजरा केला केला जातो. तरी आज मोठ्या उत्साहाने वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम तिवटग्याळ येथील महिला सरपंच पुत्र श्री गजानन नरहरे, कैलास तवर, पोलीस पाटील श्री धनराज पाटील, जयशिंग पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षक शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, कु. अश्विनी पाटील, सपना पाटील, अंजली श्रीमंगले आदी जणांच्या उपस्थितीत सरपंच पुत्र श्री गजानन नरहरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर व कार्यावरील आधारित सविस्तर माहिती दिली. तदनंतर शाळेत कृषी दिनानिमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, सरपंच पुत्र गजानन नरहरे, कैलास तवर, पोलीस पाटील श्री धनराज पाटील, जयशिंग पाटील, कु. अश्विनी पाटील, सपना पाटील, अंजली श्रीमंगले व अन्य जण उपस्थित होते