
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी करून बारा हजारांची लाच स्विकारणार्या औंध येथील जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकासह, सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.
महादेव बाजीराव गिरी वय ५२, डॉ. माधव बापूराव कनकवळे ५० आणि संजय सिताराम कडाळे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. संशयीत आरोपी महादेव गिरी हा प्रशासकीय अधिकारी, डॉ माधव कनकवळे हा शल्यचिकित्सक तर संजय कडाळे तेथील लिपीक तसेच सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यांच्याकडे सोनोग्राफी नूतनीकरण विभाग आहे. तक्रारदारांचे शिक्रापूर येथे सोनोग्राफी सेंटर आहे. या सोनोग्राफी सेंटरचे प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी लिपीक संजय कडाळे याने गिरी आणि डॉ. कनकवळे यांच्यामार्फत ४० हजारांची लाचेची मागणी केली होती.
तक्रादारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. नंतर सर्व आरोपी सापळ्यात अडकले.