
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच पहिला धक्का ठाकरे सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धक्का दिला होता. त्यानंतर आता शिंदे सरकारने ठाकरेंनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. 29 जूनला ठाकरे सरकारने अखेरची कॅबिनेट बैठक घेतली होती, त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.