
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर,
नगरपथविक्रेते अनौपचारिक नागरिक अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . नगरवासीयांच्या आर्थिक गरजा प्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवाच उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात पथविक्रेता फेरीवाला ,रहिरीवाला, ठेरहिरीवाला, इत्यादी नावाने विविध भागांमध्ये आढळतात ओळखले जाते. त्यांच्या द्वारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये उदाहरणात भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ ,चहा, भजी ,पाव, अंडी ,कापड, वस्त्र, चप्पल ,कारागीर द्वारे उत्पादित वस्तू पुस्तके स्टेशनरी इत्यादींचा समावेश होतो . सेवेमध्ये उदाहरणार्थ केसकर्तर दुकाने ,चर्मकार ,पान, दुकाने कपडे धुण्याची दुकाने ,इत्यादीचा समावेश होतो. कोविड-19 सातीचा रोग सवत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदी झाल्यामुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला होता .बहुदा ते कमी भांडवलदार पथविक्रीती करतात आणि जे काही भांडवल त्यांच्याकडे होते तेही ताळेबंद मध्ये शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पथविक्रेतांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता होती. म्हणून ही योजना अंमलबजावणीत आणली होती.
या योजनेचे उद्दिष्ट होते दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज उपलब्धतेसाठी सुलभीकरण करणे नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे.सदर योजनेची 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी शहरांमध्ये पद विक्री करीत असलेल्या सर्व पात्र पत विक्रेत्यांना लागू होती.
नगरपथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील सदर कर्जासाठी कर्ज पुरवठा संस्था बँक मध्ये प्रकारची तारण घेणार नाही. सदर योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेणारे पदविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास ते सात टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होईल व्याज अनुदानाची रक्कम अर्जाच्या खात्यात तिमाही प्रमाणे अंतराने म्हणजेच एका वर्षातून चार वेळा जमा केली जाईल.
दिनांक ३० डिसेंबर २०२०रोजी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत “मै भी डिजिटल” मोहीम राबवण्यात आली आहे .सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहारात प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना कॅशबॅक ची सुविधा देण्यात येत होती. पद विक्रेत्याने डिजिटल माध्यमातून केलेल्या व्यवहारांचा कॅडेट स्कोर तयार होईल. त्या मार्फत पत्रिकेत त्यांना त्यांच्या भविष्यातील गरजा भागवण्यासाठी पतपुरवठा निर्माण होईल. कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थाचे जाळे आणि डिजिटल पेमेंट करणाऱ्या संस्था जसे की एन पी सी आय , व, बी एच आय एम ,साठी पेमेंट गुगल ,पे भारत पे ,ऍमेझॉन पे, फोन पे, इत्यादींचा पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहाराकरिता ओन बोर्ड करण्यासाठी वापर होईल सदर ऑन बोर्ड पत्रिक्रेता खालील निकषानुसार प्रोत्साहन पर मासिक कॅशबॅक 50 ते 100 रुपये मिळत होते.
नगरपथविक्रेता समिती नगरपाल विक्रेते समितीचे लाभार्थी निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे .पद विक्रेता कायदा २०१४ मध्ये नगरपथविक्रेता समितीमध्ये जास्तीत जास्त खालील प्रमाणे १८ सदस्य असतात. महानगरपालिकान आयुक्त व नगरपरिषद नगरपंचायत मुख्याधिकारी अध्यक्ष तर ५०% सदस्य स्थानिक प्राधिकरण लोकातील प्रतिनिधी पोलीस सेवेतील लोक संघटना व्यापारी संघटना इत्यादीचे प्रतिनिधी तसेच 40% सदस्य हे पद विक्रेते प्रतिनिधी १०%सदस्य ही नामकरण केलेले संस्था समुदाय आधारित संघटनेचे प्रतिनिधी समिती बनवण्यात आली होती.
कोरोना काळात मिळून खाणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या लोकांची फार दैनंदिन अवस्था वाईट झाली होती. अक्षरशः त्यांना घर चालवणे त्या काळात मुश्किल झाले होते त्यातच त्यांचे संपूर्ण व्यवसाय सलग दोन वर्ष बंद असल्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जो काय भांडवल लागणार होता त्या भांडवलाची पण फार आवश्यकता होती याचाच विचार करून केंद्रशासनाने ही योजना अमलात आणली या योजनेचे संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात व पन्हाळगडावर पण याचा फायदा झाला पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद यांच्यामार्फत करून दिला यासाठी युनियन बँक ऑफ पन्हाळा यांचे पण सहकार्य मोलाचे ठरले होत. या योजनेचा संपूर्ण पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्र चालवणारे नागरिक महिला तसेच भेल, गोळा, मिसळपाव, सँडविच, चहा कॉफी चे दुकानदारी पानपट्ट्या केस करताना दुकान , चर्मकार, या लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. तसेच छोटे-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला एक तर वाईटकाळ हा सर्वांच्या वरच आला होता. यात कोणी कोणाला मदत करण्यासारखी परिस्थिती नव्हती अशा परिस्थितीतच पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या पीएम सो निधी योजनेचा फायदा सर्वसामान्य पर्यंत झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो मा. मुख्याधिकारी, डॉ. श्री ,कैलास चव्हाण पन्हाळा यांच्या कारकीर्दीमध्ये म्हणजेच दिनांक १७/६/२० पासून या योजनेचा जीआर नगरपरिषद ला मिळाला होता त्यानुसार नगरपरिषद ने या योजनेचा सर्वसामान्य पथविक्रेते पर्यंत पोहोचण्याचे या माध्यमाचा उपयोग करून जसे की,व्हाट्सअप ग्रुप ,प्रत्यक्ष भेटून, एकमेकापर्यंत निरोप देऊन, चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात ६४ लोकांनी याचा लाभ घेतला होता . त्यांना दहा हजार रुपये हे कर्ज म्हणून त्यावेळी दिले गेले होते. त्यामुळेच ते पुन्हा आपली दुकान किंवा दुकानातील माल खेळते भांडवल आणि त्यांना सोपे झाले होते. कारण या लोकांची ऐनवेळी अशी परिस्थिती होती कोणाकडे मागवू शकत नव्हते .आपल्याला धंदाही उघडू शकत नव्हते .याचा फार फायदा या सामान्य पथविक्रेता लोकांना झालेला आहे. त्यानंतर मा, मुख्याधिकारी म्हणून स्वरूप खारगे दि, १३ ऑगस्ट २०२० ला रुजू झाल्यानंतर त्यांच्या काळात पण ही योजना पुढे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने यशस्वी पुढे गेली. त्यांच्या काळात ५५ लोकांना याचा लाभ त्यांनी करून दिला. या योजनेची लाभार्थी या महिला ४५ जण होते तर संपूर्ण राहिलेले सर्व पुरुष होते.
या योजनेची संपूर्ण विभाग मा श्री आनंद रेडेकर समुदाय संघटक अधिकारी सो पाहत होते .वरील संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला दिली, तसेच ही योजना राबवत असताना त्यांच्या मदतीला कर्मचारी वर्ग राबत होता, अमित माने. मुकुल चव्हाण, सुमन गायकवाड ,जयश्री देवकुळे , तसेच नगरपरिषद चे नगरअध्यक्ष मॅडम , नगरसेवकांची मदतीने ही संपूर्ण योजना पन्हाळा शहरात राबवण्यात आली होती. यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया चे अधिकारी मॅनेजर, सो, पूजा रोडे व श्री, मनोज शिवनगावकर यांचे सहकार्य मोलाचे होते.
श्री,जितेंद्र शांताराम पवार चप्पल विक्रेते व्यवसायिक योजनेबाबत बोलतात, कोरोना काळात आमचे सर्व काही संपलं होतं ,नगरपरिषद व युनियन बँक यांनी आम्हाला बोलवून या योजनेची माहिती दिली . आम्हाला दहा हजार रुपये कर्ज थोडेफार कागदपत्रे घेऊन दिले. याचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले त्यानंतर मी ते दहा हजार रुपये फेडले व मला वीस हजार मिळाले ते सुद्धा मी फेडले आता मला पन्नास हजार मिळाले आहेत. असेच सहकार्य नगरपरिषदचे व युनियन बँक ऑफ इंडिया यांचे असावे आमच्याकडे सर्व संपलं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला मदत म्हणून कर्ज दिले. त्याचे कधीही उपकार आम्ही विसरणार नाही. या योजनेमुळे आम्हाला व्यवसायात थोडाफार सावरण्यास आधार मिळाला.
सौ,जयश्री प्रभाकर भरमर झुणका भाकरी दुकानदार ,कोरोना काळात अक्षरशा सर्व भांडवल संपले होते. त्या काळात आम्ही फक्त दहा हजार रुपये काढले व ग्राहक ऑनलाईन खात्यावर पेमेंट करत होते त्यातूनच ते कर्ज ऑनलाईन स्वरूपात ते फिटले आता सुद्धा सीजन हंगाम चांगल्या प्रकारे गेला .पुन्हा पैसे आम्ही काढले नाहीत परंतु आता पुन्हा पावसाळा चालू झाला आहे. आता आम्ही पुन्हा कर्ज काढण्याच्या विचारात आहोत.
श्री,प्रवीण काशीद, केसकर्तर दुकान ,त्यांनी अशी माहिती दिली की, मी पण हे पैसे काढले होते कारण मध्ये आमच्यावर सुद्धा वाईट परिस्थिती आली होती आमच्या दुकानात सुद्धा कुलूप लावले होते त्यामुळे माझा व्यवसाय हा ठप्प होता .मी काही पाहुण्या मंडळ मित्रमंडळी कडून पैसे उसने घेतले होते व त्यांचे परत करण्यासाठी मी या कर्जाचा उपयोग केला होता. एक त्या काळातली चागली लोकांना झालेली मदत या योजनेबद्दल मला सांगता येईल.