
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
कंधार : शहर परिसरात व संपूर्ण तालुक्यातील सर्वच गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर तालुक्यातील अवैध धंदे हायटेक पद्धतीने सुरु करण्यात आले तसेच तालुक्यात काही ठिकाणी सर्वात जास्त मटका, जुगार, गुटखा जोराने सुरु आहे.या सर्व अवैध धंद्यांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने मात्र दूर्लक्ष होतांना दिसून येत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ अवैध धंदे बंद करण्यासाठी चार दिवसाचा अल्टीमेट दिल्याची माहिती कंधार येथे पत्रकार परिषदेत विद्यमान आमदारपुत्र तथा विक्रांतदादा शिंदे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विक्रांतदादा श्यामसुंदर शिंदे यांनी दिली.कंधार येथील पत्रकारांशी संवाद साधतांना शिंदे म्हणाले की, कंधार-लोहा तालुक्यात अवैध धंद्याचे थैमान माजवले आहे. याचा परिणाम गरीब कुटुंबावर होत असून मतदार संघातील गोरगरीब युवक याच्या व्यसनी जाऊन आपले जीवन संपवत आहे.येत्या चार दिवसात लोहा कंधार मतदार संघातील अवैध धंदे पूर्णपणे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे नाहीतर मित्रमंडळाचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर येतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवभावल्यास यास सर्वस्वी जबाबदार लोहा कंधार मतदार संघातील सर्व पोलीस ठाणेप्रमुख राहतील असे आव्हान विक्रांत दादा शिंदे यांनी कंधार येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
येत्या चार दिवसांत सर्व अवैध धंदे माझ्या मित्र मंडळामार्फत बंद करणार असल्याची माहिती दिली.वेळप्रसंगी आमच्या स्टाईलने प्रशासनावर दबाव आणणार आहे.हे करत असतांना आमच्यावर केसेस झाल्या तरी चालेल.जर पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर पोलिस विशेष पोलिस महानिरीक्षकापर्यंत या बाबी पोहचविणार असल्याचे यावेळी सांगितले.
कंधार लोहा तालुक्यात अनेक अवैध धंदे आहेत.शहरातीलर व्यापारी दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आली.याच जागेत आता पाल टाकून दारु,मटक्या सारखे अवैध धंदे जोरात सुरु आहेत.ते सर्व अवैध धंदे आता बंद करणार असून पोलिस प्रशासनाला चार दिवसांचा अल्टीमेट देण्यात येत आहे.असे ते यावेळी म्हणाले.या पत्रकार परिषदेला शेकापचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेरूभाई,कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती अरुण कदम,महेश पिनाटे,अशोक सोनकांबळे आदींसह विक्रांत दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.