
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- दिनांक १३ जुलै २०२२ रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पूर्णानगर येथे जिल्हाध्यक्ष मा.छोटू महाराज वसु यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले.पूर्णानगर येथील युवकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी छोटू महाराज वसू यांनी पूर्णत्वास नेऊन त्यांना व्यायामाची साधने उपलब्ध करून देऊन त्यांना मदत केली.यावेळी सर्व स्थानिक युवकांनी उदघाटन निमित्ताने पूर्णानगर येथील मा.छोटू महाराज वसू यांचे शतशः आभार मानले.
या उदघाटन कार्याप्रसंगी गावातील युवक प्रामुख्याने उपस्थित होते व प्रहारचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित होते.