
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अरुण भोई
वैकुंठेतो एॆॆसी नाही!कवळ काही काल्याचे! एकमेका देऊ मुखी, सुखी घालू हुंबरी!! या संत वचना प्रमाणे गोपाळकाल्याचा उत्सव साजरा करण्यात येतो.
!! गोपाळकाला गोड झाला
गोपाळाने गोड केला!! च्या जयघोषात अवघी राजेगाव नगरी भक्तीमय वातावरणात दुमदुमून जाते.
आशा प्रकारे भजन करीत भक्तीमय वातावरणात राजेगाव येथे गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या आषाढ शुद्ध पोर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी पंढरपुर येथील गोपाळपूर नंतर महाराष्ट्रात फक्त राजेगाव येथेच गोपाळकाला साजरा करण्यात येत असल्याने जुने जानकार सांगतात गावात यात्रा भरत नसल्याने गावचा वार्षिक उत्सव म्हणजे सालाबादप्रमाणे साजरा होणारा गोपाळकाला बुधवार दिनांक १३/०७/२०२२ रोजी गुरुपौर्णिमेला साजरा झाला आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सालाबादप्रमाणे साजरा होणारा ग्रामदैवत राजेश्वरमहाराज सप्ताह दिनांक २१/०८/२०२२ते २८/०८/२०२२ रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार व गायनाचार्य यांच्या मधुरवाणीने संपन्न होणार आहे , ग्रामदैवत श्री. राजेश्वरमहाराजांचा भंडारा दिनांक २८/०८/२०२२ रोजी साजरा होणार आहे.
बुधवार दिनांक १३/०७/२०२२ रोजी साजरा होणारा गोपाळकाला गावातील बहुतांश आबालवृद्ध विशेषतः गावातील पण परगावी रहिवाशी आवर्जुन या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. या दिवशी प्रत्येकाने आपल्या नवसाप्रमाने पेढे व गुळाची शेरणी वाटली जाते. दहीहंडी आणण्याचा मान वाघमारे बांधवांना व मंदिराला दहीहंडीची प्रदिक्षना घालताना दहीहंडीच्या पुढे टाळ वाजवण्याचा मान पानसरे बांधवांना असतो. पाच वाजता भक्तीमय वातावरणात देवांची आरती घेऊन पोलिस पाटलांच्या हस्ते राजेश्वर मंदिरात दहीहंडी फोडण्यात येते. दहीहंडी मध्ये काल्याच्या प्रसादासाठी पोहे, दही, दुध, ताक, लोणी असे प्रमुख घटक भक्तीचे निदर्शक असतात. निर्गुण भक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रम्हांडात कृष्णतत्वाच्या आपतत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात. या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.त्यामुळे दहीहंडीचा प्रसाद खाण्यासाठी भावीकांची गर्दी होते.
जुण्या रुढी परंपरेने चालत आलेल्या पालखीचा मान पुढच्या बाजूला पालखीला खांदा लावण्यासाठी राऊत, शिंदे, देशमाने व मागच्या बाजूला पालखीला खांदा लावण्यासाठी मेंगावडे बांधवांना दिला जातो. चौरी व आब्दागीरी पालखी सोबत धरण्याचा मान वाघमारे बांधवांना देण्यात येतो. लाकडाची दिवटी अथवा हिमाळ पेटवून गावाला प्रदिक्षणा घालण्यात येत होती, दिवटी घेण्याचा मान सातपुते, पांडव बांधवांना होता. गाव प्रदक्षिणा घालताना दिवटी पुढे डफ वाजवण्याचा मान मोघे बांधवांना व सणई वाजवण्याचा मान भोसले बांधवांना होता . वैरण २५० पेंढ्या गोळा करण्याचा मान संपूर्ण गावकरी बांधवांना होता.
पालखी राजेश्वर मंदिर राजेगाव येथुन टाळ मृदुंगाच्या भक्तीमय वातावरणात *प्रतीपंढरपुर जुने राजेगाव* येथे भिमा नदीच्या तीरावरती जाते. वैरणीच्या २५० पेंढ्या बांधून चार फूट उंचीची परडी बनवली जात होती परंतु आता कमतरते अभावी १२५ पेंढ्यांची परडी बांधण्याचा मान गावातील संपूर्ण मराठा बांधवांना व इतर समाजातील प्रत्येक एका व्यक्तीला असतो. परडीची खणा नाराळाने ओटी भरुन विधीवत पूजा केली जाते.पाच किलो कनकीचा दिवा बनवून परडीवर ठेवला जातो. गावकऱ्यांनी परडी व दिव्याचे संपूर्ण साहित्य देऊन दिवा व काकडा बनवण्याचा मान गुरव बांधवांना असतो. दिवा पेटवून परडी पाण्यात सोडली जाते. परडी आणि दिवा प्रवाहाबरोबर न विजता शिवे बाहेर जातो. प्रवाहाबरोबर शिवे बाहेर नेण्याचा मान गायकवाड, शिंदे ,भोई बांधवांना असतो.
दिव्याची अख्यायिका जुने जाणकार सांगतात परडीवरील दिवा नविजता प्रवाहाबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरला सुर्योदयापुर्वी पोहोच होत होता. त्यामुळेच पंढरपूर येथील गोपाळपूर नंतर महाराष्ट्रात फक्त राजेगाव येथेच गोपाळकाला साजरा करण्यात येतो गेले दोन वर्षापासून करोनामुळे साजरा करता आला नाही यावर्षी अगदी आनंदात आणि उत्सवात गावकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी साजरा केला