
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
शेतकऱ्यांना पंचनामे करून पन्नास हजार हेक्टरी मदत द्या
मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, यावर्षी वेळेवर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या पण अचानक गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे काही भागातील पिके नष्ट झाली आहेत. तात्काळ कृषी विभाग कृषी अधिकारी महसुल तलाठी तहसीलदार कृषी सहायक सर्वांनी पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी झुंजार क्रांतीसेनेचे सचिव गजानन चावरे यांनी केली आहे.
काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे
शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना
करावा लागत आहे,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाला करायला लावावेत व शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी झुंजार क्रांतीसेनेचे सचीव गजानन चावरे यांनी केली आहे.