
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनीधी -रामेश्वर केरे
कॉस्मो फाउंडेशनकडून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त रांजणगाव पोळ येथे गुरुवार दि१४ रोजी मोफत प्राथमिक रोग निदान तसेच नेत्रनिदान शिबीराचे आयोजित करण्यात आले. या शिबीरात गावातील एकूण ६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कास्मो फाउडेशन, मेडीकव्हर हॉस्पिटल,ए.एस.जी.आय. हॉस्पिटल,औरंगाबाद आणि एल.एस.डी.पी.स्कूल,रांजणगाव पोल यांच्या सहयोगाने ग्रुप ग्रामपंचायत आपेगाव आणि रांजणगाव पोल येथे करण्यात आले. या शिबीरा प्रसंगी कॉस्मो फाउंडेशनच्या सी.एस.आर.कॉरडीनेटर हेमलता राजपूत मॅडम, क्लस्टर कॉरडीनेटर राजू शेख,लक्ष्मीकांत बनकर,सतिश जगताप गावतील सरपंच आणि उपसरपंच आणि एल.एस.पी.डी. स्कूलचे मुख्याध्यापक थोरात सर यांचे विशेष सहकार्य लाभले.