
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी — गोविंद पवार
आषाढी पौर्णिमा अर्थातच “गुरूपौर्णिमे”च्या निमित्ताने लोहा येथील शिवसेनेचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रती असलेल्या आदरभाव नम्रपणे व्यक्त करत त्यांना वंदन करण्यात आले.
हिंदू हृदय सम्राट “स्व.बाळासाहेब ठाकरे” यांनी शिवसेनेची स्थापना करून आयुष्यभर हिंदू धर्म व मराठी माणसासाठी जीवाचे रान केले.हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हितासाठी पुर्ण आयुष्य झिजवले.यांना पुर्वी पासून गुरूस्थानी मानून ८०टक्के समाजकारण,२०टक्के राजकारण करत नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे प्रथमतः शिवसैनिक, पहिले जिल्हाप्रमुख होवून जिल्हाभरातील गावे,वाडी तांड्यावर शिवसेनेची पाळेमुळे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी रोवली.अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेत जिल्हा भरात वेगळी ओळख निर्माण केली. दोन वेळा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले.अनेक विकास कामे खेचून आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला, अनेक गोरगरीब कष्टकरी, सामान्यांना न्याय मिळवून दिला.
गुरु पोर्णिमे निमीत्त लोहा शहरातील “कैलास स्मृती” निवासस्थानी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, विठ्ठल-रुक्मिणी, वडील स्व.खोब्राजी पाटील चव्हाण यांच्या पावनस्मृतीस त्यांच्या प्रतिमेची पुष्प पुजा करत पुष्पहार अर्पण करत आरती करून गुरूंना माजी आमदार रोहिदास चव्हाण व पत्नी माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई रोहिदास चव्हाण यांनी मनोभावे वंदन केले. यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण,लक्ष्मण चव्हाण,मोहन वाघमारे सह अनेकांची उपस्थिती होती.