जालना प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर, पत्रकार संघटनेला नवी ताकद
जालना : ग्रामीण भागातील पत्रकारांना बळ देण्यासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ च्या जालना जिल्हा कार्यकारणीची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. सात्विक भोज येथे आयोजित छोटेखानी पण उत्साहपूर्ण कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली तसेच सर्व सभासदांना संघटनेची ओळखपत्रेही वितरित करण्यात आली.
या कार्यकारणीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संपादक विकास कुमार बागडी यांची नियुक्ती करण्यात आली असून मराठवाडा संघटक म्हणून सुयोग खर्डेकर यांची निवड करण्यात आली आहे. जालना जिल्हाध्यक्षपदी संपादक विकास काळे यांची निवड झाली असून जिल्हा सचिवपदी आकाश माने यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी राजेश गौड तर शहराध्यक्षपदी देवचंद सावरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना विकास कुमार बागडी यांनी ग्रामीण पत्रकार संघटना ही तळागाळातील पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही दिली. तर मराठवाडा संघटक सुयोग खर्डेकर यांनी सर्व सभासदांना नववर्षाच्या शुभेच्छा देत संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष विकास काळे यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी देवचंद सावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विकास कुमार बागडी, सुयोग खर्डेकर, विकास काळे, आकाश माने, देवचंद सावरे, युवराज कुरील, राजेश गौड आदी पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
