ठाणे प्रतिनिधी-नागेश पवार, कल्याण: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड राज्यात जोमाने सुरू आहे. सरकारच्या जनहितार्थ कामांवर विश्वास ठेवून विरोधी पक्षांतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कल्याण परिसरातील विभाग अध्यक्ष गणेश मुंढे आणि निकिता मुंढे यांच्यासह ‘उबाठा’ गटाचे शाखाध्यक्ष किरण जाधव, मनोज पावशे, सोनिया म्हात्रे, हेमंत जाधव, पुष्पा पानिकर, चंद्रकांत मोटे, जावेद शेख, ज्योती माळी, वैभव कुलकर्णी, भूषण अहिरे, सुनीता गव्हाणे, अलका देवरे, चारुलता विश्वकर्मा, सुषमा साळवी, सुनीता सानप, अबू खान, अरीफ खान, राजेंद्र आडागळे, सूरज घाडगे, सतीश आढागळे, रोहित लोंढे, दीपक घाडगे यांसारख्या अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे.

राजकीय प्रवेशासोबतच सामाजिक बांधिलकी जपत, शिवसेना महाराष्ट्र राज्य सिंधी सेलच्या जया साधवानी आणि कामगार नेते राजेंद्र अढांगळे यांच्या पुढाकाराने ‘नशा मुक्ती अभियानाचा’ शानदार शुभारंभ करण्यात आला. तरुणाईला व्यसनाधिनतेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून हे विशेष पाऊल उचलले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यात प्रामुख्याने: आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक रमाकांत मढवी, अब्दुल भाई शेख, निलेश पाटील, निखिल चौधरी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवूनच आज मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत सामील होत आहेत.” या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
