पाणीपट्टी सदनिकाधारकाचे कमी करा
नगरसेवक…… योगेश काळोखे
देहूगांव प्रतिनिधी ,बद्रीनारायण घुगे
महाराष्ट्र राज्यातील पाणीपट्टी (Water Tax) म्हणजे पिण्याचे पाणी, शेती किंवा औद्योगिक वापरासाठी पुरवल्या जाणाऱ्या पाण्यावर जलसंपदा विभाग किंवा ग्रामपंचायतीकडून व नगरपरिषद नगरपंचायत आकारले जाणारे हे शुल्क शाश्वत पाणीपुरवठा आणि जलसंधारणासाठी वापरले जाते. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी आता स्वतंत्र यंत्रणा आणि डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत असुन टॅक्स कमी करता येतो . या मध्ये घरमालकाला भरमसाट पाणी टॅक्स दिल्या जातो
सदनिकांच्या मागणीनुसार
देहू नगर पंचायत हद्दीतील *ऑल सोसायटी फेडरेशन देहू* यांच्या मागणीनुसार नगरसेवक योगेश भाऊ हनुमंतराव काळोखे यांनी देहू नगर पंचायत चे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन सोसायटी मधील सदनिका धारकांचे वार्षिक पाणीपट्टी बिल ३००० रुपये वरून कमी करण्यासंदर्भात निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या पुढील काळात लवकरच वार्षिक पाणीपट्टी बिल ३००० रुपये कमी कसे करता येईल याबद्दल चर्चा केली व याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले व यामुळे सदनिकाधारकांना होणारा आर्थिक त्रास कमी होईल व सदनिका धारकांचे वार्षिक पाणीपट्टी बिल ३००० रुपये वरून कमी होईल यामुळे सर्वांना सदनिका धारकांना दिलासा मिळेल. अशा मागणी नगरसेवक योगेश हनुमंत काळोखे यांनी केली आहे

