
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राज्यवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्याकडून पिंपरी बुद्रुक येथील धोंडीबा रनदिवे यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यात आले.
पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी धोंडीबा रनदिवे यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी हृदय विकाराच्या आजाराने निधन झाल्याने. राजवर्धन पाटील यांनी धोंडीबा रनदिवे यांच्या कुटुंबाला भेट दिली. व त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन धोंडीबा रनदिवे यांच्या निधनाबद्दल चौकशी केल्यानंतर दुःख व्यक्त करून सांत्वन करण्यात आले. काही आडचन व मदत लागल्यास रणदिवे कुटुंबाला मदतीचे सहकार्य करू आसे सांत्वन भेटी निमित्त आल्यानंतर राजवर्धन पाटील बोलत होते.
यावेळी महादेव रणदिवे, भाऊ रनदिवे, शालन रणदिवे, शंकर रनदिवे, पप्पू रणदिवे, सचिन रणदिवे, राहुल दोडके, तेजस साठे, बापूराव दोडके, दादाभाई शेख, ईसुब शेख, यांनी यावेळी राज्यवर्धन पाटील यांचे आभार व्यक्त केले,