
दैनिक चालु वार्ता कोरपणा ता.प्रतिनिधी-प्रमोद खिरटकर
कोरपणा या तालुक्याच्या ठिकाणावरून जवळ असलेल्या पकडी गड्डम जलाशयावर सतत होत असलेल्या पावसामुळे सांडवा ओसंडून धो धो पाणी पडत असल्याने परिसरातील नागरिकांनी पर्यटन म्हणून नव्हे तर मासोळी प्रवाहाबरोबर वाहून जात असल्याने परिसरातील नागरिकांनी जत्रेचे स्वरूप या ठिकाणी आले होते तरुण लहान मुले महिला पाण्यात घुसून मासोळी पकडण्या साठी धडपड करून मासोळी पकडत आहे मात्र मासोळीच्या नादात एखाद्याच्या जीवावर बेतू नये यासाठी सकाळपासूनच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी लोकांना हुसकावून लावीत आहे महसूल विभाग देखील लाऊड स्पीकर संच घेऊन त्या ठिकाणी हजर झाले मंडल अधिकारी पचारे तलाठी कुडमेथे हे त्या ठिकाणी हजर राहून लोकांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघण्याची आवाहन करीत आहे तसेच या ठिकाणी झालेल्या मच्छीमारांच्या नुकसानीचे पाहणी करून पंचनामा केला सतत त्या होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नाल्याकाठी गावकऱ्यांना सावध राहण्याचा सूचना दिलेले आहेत.