
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
– अहमदपुर/प्रतिनिधी
गेल्या आठवडाभर झालेल्या संततधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत,तर अनेक ठिकाणी गोगलगाईने पिक फस्त केल्याने अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्फत केली आहे.
अहमदपुर व चाकुर तालुक्यातील खरीपाच्या 100% पेरण्या झाल्या आहेत.सदरील काही पिकांची उगवण होताच गोगलगाईने पिकं खाऊन फस्त केली तर राहीलेल्या पिक अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेल्याने शेतीत तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याने अहमदपूर व चाकुर तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.तसेच अतिवृष्टीमुळे अहमदपूर व चाकुर तालुक्यातील रस्ते व पुलाचे मोठे नुकसान झाले असून ते तात्काळ दुरुस्त करावेत, तसेच दोन्ही तालुक्यातील काही ठिकाणी विद्युत पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे सदरील पोल उभे करून विद्युत पुरवठा त्वरित चालू करावा अशा अनेक मागण्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत एका शिष्टमंडळाद्वारे केली आहे.
सदरील शिष्टमंडळात यावेळी माजी सभापती अँड.आर.डी.शेळके, भाजपचे प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे, तालुका अध्यक्ष हणमंत देवकते, रामभाऊ बेल्लाळे, कमलाकर पाटील, गोविंदराव गिरी, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,शिवराज पाटील, शेषेराव राठोड, सुधीर गोरटे, रामभाऊ नरवटे,माणीक नरवटे, सुखदेव कदम, चंद्रशेखर डांगे, राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, सत्यजित पाटील,बबनराव नवटक्के, संतोष पवार, बाबुराव बावचकर,विक्रम भोसले, अमोल पाटील, पांडुरंग पाटील, संतोष कल्याणे,गोविंद बैकरे,शुकुर जागीरदार, प्रदीप खोमणे,आसिफखान पठाण, श्रीकांत भुतडा, दादा उटगे,शाम यादव, तुकाराम देवकते, शिवकुमार हिप्परगे,राम देवकते, सतिश मुसणे,संगम कुमदळे, अर्जुन सुरनर,सत्तार बागवान, धोंडीराम राठोड, शिवाजी शेळके, नारायण कदम, विनायक जोडतले, संजय कदम यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.