
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि. १५: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्सच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर पुणे येथे स्किल एक्स्पो व कौशल्य प्रशिक्षण प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त कविता जावळे, कौशल्य विकास अधिकारी प्रशांत नलावडे, दि आसरा फौंडेशनचे अजय कौतिकवार, अनुशक्ती तायडे, ऐश्वर्या कुलकर्णी, ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मीता धुमाळ, संचालक राजेश नागरे यांच्यासह प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्य शासनाने युवकांनी उद्योजकतेची कास धरावी म्हणून आपली भूमिका युवकाभिमुख केली आहे. त्यामुळे कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नावीन्यतेसह उद्योजकेतची कास धरावी. विविध महामंडळाकडून उद्योजकतेसाठी युवकांना वित्तसहाय्य देखील देण्यात येत आहे. युवकांनी अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्रीमती जावळे यांनी केले.
यावेळी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थ वस्तु, आकर्षक वस्त्रप्रावणे यांच्या स्किल एक्स्पोला मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.