
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने कष्टकऱ्यांचे जगणेही जिकीरीचे झाले. रोजगार नसल्याने अनेकांना घरातील दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले.त्यातच विधवा, घटस्फोटित,निराधार महिलांना तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता.कोरोना,लाॅकडाउन यामुळे महिलांना हातमजूरी मिळत नव्हती.खोड्या पाड्यात रोजगार बंद झाले. यामुळे लोकांची परिस्थिति बिघडत होती,यात विशेष करून विधवा,घटस्फोटित,निराधार गरीब महिला यांच्यावर मोठा परिणाम झाला होता. या महिलांना मदत करण्याकरिता पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणुन बंधन सामाजिक संस्थेने महिलांना कपडे,धान्य किट वाटप, शिलाई मशीन देण्यात आली.मदतीमुळे या महिला भावनिक झाल्या होत्या.यावेळी भूम तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रभाकर डोंबाळे, देवग्रा गावचे सरपंच विश्वास टकले,नानासाहेब मोटे,पत्रकार आबासाहेब बोराडे ,वसीम काळजेकर, बंधन सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते, सर्वांनी यांचे आभार मानले.