
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी -दत्तात्रय वा. कराळे
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोसवी वर्षा निमित्त संपूर्ण परभणी जिल्हा हर घर तिरंगा व स्वराज्य मह़ोत्सव या विशेष नियोजनाखाली ही मोहीम राबवली जावी यासाठी संपूर्ण परभणी जिल्हा सज्ज झाला असून या कामी सर्व नागरिकांचे सहकार्य अभिप्रेत आहे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाची जोमाने ही मोहिम राबविणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल ग़ोयल यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सभागृहात आयोजित विशेष बैठकीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उप जिल्हाधिकारी महेश वरदकर, जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप साहेप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आचारसंहितेचे सर्व नियम व आदींचे काटेकोरपणे पालन करुन हा उपक्रम अत्यंत कसोटीने व सचोटीने राबविला जाणे आवश्यक असल्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले. यावेळी चार लाख ध्वज उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एकूणच “हर घर तिरंगा ” हा उपक्रम जिल्हाभरातील सर्व नागरिक, प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकोप्याने मिळून नेत्र दीपक यशस्वी कामगिरी होईल असाच राबवावा असेही शेवटी सांगितले.